दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे.
गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.