गुरूवार, फेब्रुवारी 13, 2025
Homeक्रीडाभारताने U19 महिला T20 विश्वचषक जिंकला: भारताच्या लेकी जगात भारी

भारताने U19 महिला T20 विश्वचषक जिंकला: भारताच्या लेकी जगात भारी

U19 महिला T20 विश्वचषक 2025: भारताच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-१९ महिला T20 विश्वचषक 2025 चे जेतेपद पटकावले आहे. भारताच्या फिरकीपटू त्रिकुटाने या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतीय १९ वर्षाखालील संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला आहे. अंडर-१९ T20 विश्वचषक 2025 मध्ये अजिंक्य राहिलेल्या भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सानिका चाळकेचा विजयी चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केले आहे. भारताच्या या अंतिम फेरीतील विजयात भारताच्या फिरकी त्रिकुटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आयसीसी T20 वर्ल्डकपमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज गोंगाडी त्रिशा हिने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, याशिवाय तिने गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय पारूनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी या फिरकी त्रिकुटाने भारताचा विजय अधिक सोपा केला.

नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी पार चुकीचा ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांत सर्वबाद झाला. २३ धावा ही आफ्रिकन फलंदाजांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागलं.

आफ्रिकेने पॉवरप्लेमदरम्यान ३ विकेट्स गमावत अवघ्या २९ धावा केल्या होत्या. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ७ ते १० षटकांमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकही विकेट गमावली नसली तरी अवघ्या ४ धावा केल्या. भारताकडून फिरकीपटूंनी ९ विकेट तर वेगवान गोलंदाजाने एकच विकेट घेतली आहे. पारूनिका सिसोदियाने ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यानंतर आयुषी शुक्लाने ९ धावा देत २ विकेट्स, वैष्णवी शर्मा २३ धावा देत २ विकेट तर गोंगाडी त्रिशाने १५ धावा देत ३ विकेट्स नावे केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments